
राष्ट्रवादीचे नेते युवा उद्योजक श्री. सोमनाथ खराडे यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश
करमाळा : राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वांगी गावचे युवा नेते उद्योजक श्री. सोमनाथ बाळू खराडे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचे नेते भाजप आमदार मा. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप सरकारच्या विकास

कामांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या कर्तृत्वावर तसेच पक्षातील शिस्तिवर विश्वास दाखवून त्यांनी हा प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे. येत्या काळात सोमनाथ खराडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून वांगी भागात विविध विकासकामे करण्यावर भर देणार असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी सांगितले. सदर प्रवेश हा अकलूज येथे

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शिव रत्न बंगला या निवास स्थानी करण्यात आला. सोमनाथ खराडे हे त्यांच्या उत्कृष्ट भाषण शैली मुळे प्रसिध्द आहेत. त्यांच्या पत्नी सौ. निता सोमनाथ खराडे या राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या पुणे शहर उपाध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी नुकतीच त्यांनी वांगी नंबर ३ मधून अपक्ष

ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. अपक्ष असूनही त्यांनी घेतलेली ११० मते ही लक्षणीय होती. पुढील काळात समाजातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून भाजपच्या माध्यमातून त्यांची कामे करून रणजित दादांच्या नेतृत्वाखाली त्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सोमनाथ खराडे यांनी सांगितले.

यावेळी करमाळा तालुक्यातील मोहिते पाटील गटाचे नेते शहाजी देशमुख सर, सविता राजे भोसले, उदयसिंह मोरे पाटील, महेंद्र पाटील, अजित तळेकर, ॲड. दिपक देशमुख, ज्ञानेश पवार, अमरजित साळुंखे, आबा टापरे, बापू तळेकर, संतोष खाटमोडे पाटील, बंडू माने इ. उपस्थित होते.

