
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील
श्रीकमला देवी मंदिर जीर्णोद्धारा साठी दि. २५ /०८/२०२६ मंगळवार रोजी अशोक श्रीरंग आव्हाड (सर) व आव्हाड परिवार रा.करमाळा यांचे कडून अशोक श्रीरंग आव्हाड सर यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्त इतर खर्च न करता श्री जगदंबा कमला देवी मंदिर जतन संवर्धन कामास यांचे कडून रु.२५,०६७/- (रु.पंचवीस हजार सदुषष्ट फक्त फक्त) धनादेश ने देणगी श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन कामस प्राप्त झाली आहे. यावेळी श्रीकमला देवी मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार मंदिर समितीचे विश्वस्त सुशील राठोड, मंदिर पुरोहित श्रीनिवास पुराणिक, मंदिर पुजारी रत्नदीप पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे,अशोक गाठे व्यवस्थापक यांनी सत्कार केला आहे. यावेळी आव्हाड परिवार करमाळा तसेच मानकरी, सेवेकरी, भक्तगण इत्यादी उपस्थित होते.

श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट करमाळा यांचे कडून करण्यात आलेले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध आहे. देणगीसाठी संपर्क:- अशोक गाठे व्यवस्थापक. मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४.