सिना नदी पुरग्रस्त भागातील समस्या सोडविण्याबाबतचे निवेदन पालकमंत्री गोरे यांना जाधव पाटील यांनी दिले
करमाळा प्रतिनिधी
सिना नदी पुरग्रस्त भागातील समस्या सोडविण्या बाबतचे निवेदन पालकमंत्री ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस अजिंक्य जाधव पाटील यांनी दिले होते.
या निवेदनात म्हटले आहे की,
माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात अलीकडील पुरामुळे तरडगाव, बिटरगाव, पोटेगाव, आळजापूर, खडकी, परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्‌या प्रमाणात शेतीचे व पिकांचे नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर खालील तातडीच्या मागण्या आपल्या निदर्शनास आणून देत आहोत

  1. तरटगाव – बिटरगाव रस्ता पूरामुळे मोठ्‌या प्रमाणात खराब झाला आहे. तो त्वरित दुरुस्त करावा.
  2. पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी..
  3. तरटगाव व संगोबा को.प बंधारा – याचे बॅरेज रूपांतर करण्यात यावे.
  4. तरडगाव बंधाऱ्यातून नवेदार टाकल्यानंतर आळजापूर व बिटरगाव सीमेवरील शेतांमध्ये पाणी साचून शेतीचे नुकसान होते. तसेच शेतकऱ्यांना बंधाऱ्याचे संपूर्ण पाणी मिळत नाही. यासाठी येथील मागच्या बाजूला त्वरित भिंत बांधकाम करावे.
  5. पोटेगाव बंधारा येथील बांधकाम व संरचना दुरुस्त करावी.
  6. मांगी तलावातील पाणी सोडण्यासाठी बिटरगाव (श्री) येथील साईपण काम त्वरित सुरू करण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे,भाजपा नेते कन्हैयालाल देवी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सुजित बागल, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अशपाक जमादार, खडकीचे दादा जाधव ,जातेगावचे युवा नेते तुषार शिंदे आदीजण उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *