करमाळा प्रतिनिधी

श्री गणेश व्यापारी मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणुकीचा अनावश्यक खर्च कमी करून तो निधी सामाजिक कामासाठी वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मेन रोडवरील जय महाराष्ट्र चौक ते फुलसोंदर चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मिरवणुकीवरील खर्च कमी करून उपलब्ध निधीतून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्यास मंडळाच्या सदस्यांनी एकमताने सहमती दर्शविली.

गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपणारा असावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे नागरिक व व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे. “गणरायाच्या उत्सवातून समाजहिताचे कार्य — हाच श्री गणेश व्यापारी मंडळाचा संकल्प!”

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *