आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समर्थनात आंदोलने करणारे अतुल खूपसे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल

करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलीस ठाणे गु.र.नं.736 /2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951चे कलम 135 प्रमाणे

1) फिर्यादी पो कॉ 744 गणेश सुभाष दळवी. नेमणूक-करमाळा पो. ठाणे

2) आरोपी 1)अतुल खुपसे रा. उपळवाटे ता. माढा जी सोलापूर, 2) गणेश भानवसे 3) बालाजी तरगे 4)ईश्वर बापू शिंदे रा. खाबेवाडी ता. करमाळा 5) काका दरगुडे 6) वैभव मस्के 7) निलेश पवार 8)साहेबराव विटकर 9)हनुमंत कानतोडे10)सागर महाराज 11)शरद पूर्ण नाव माहित नाही

3) गु घ ता वेळ ठिकाण- दि. 05/09/2025 रोजी दुपारी 15.25 वा ते दि. 5/09/2025 15.30 वा च्या दरम्यान रोजी पर्यंत मौजे देवीचा माळ, कमलाभवानी मंदिरासमोर ता करमाळा

5) हकिकत – यात हकिकत अशी की, दि. 05/09/2025 रोजी दुपारी 15.20 वाचे दरम्यान मोजे देवीचा माळ करमाळा येथील कमलाभवानी मंदिरा समोर वरील लोकानी मा. Ips अंजना कृष्णा व्हीएस उपविभागीय अधिकारी करमाळा सोलापूर ग्रामीण या कुर्डू ता. माढा जि सोलापूर येथे बेकायदेशीर अवैध्य मुरूम उपसा करीत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याकरता गेले असता त्या ठिकाणी माननीय नामदार अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तेथील लोकांनी फोन करून बोलण्यास देऊन सदर कॉल चे रेकॉर्ड करून जनमानसात अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन केली या घटनेच्या निषेधार्थ मा.जिल्हाअधिकारी सो सोलापूर यांचा जमाव बंदी आदेश असताना जमाव बंदी आदेशाचा भंग करून गैर कायद्याचे मंडळी जमवून मा. Ips अंजना व्ही.एस. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग सोलापूर ग्रामीण यांचे पोस्टर वरील फोटोस दूध्दा अभिषेक केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *