विभागीय आयुक्तांनी दिले उपअभियंता गायकवाड यांच्या चौकशीचे आदेश
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील उपअभियंता बी.एच. गायकवाड यांच्या भ्रष्ट कामकाज पद्धतीमुळे तालुक्यातील सरपंच व ठेकेदार वैतागले होते. या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात जनशक्ती संघटनेने पैसे वाटप आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज पुणे येथील विभागीय आयुक्तांच्या परिसरात जनशक्ती संघटना पोहचली असता पोलिसांनी मध्यस्थी करत आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सोलापूर जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना सदर कर्मचाऱ्याच्या चौकशीचे तातडीचे आदेश देऊन अहवाल देण्याचे सांगितले आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून करमाळा तालुक्यात उपअभियंता गायकवाड बी.एच. हे ठेकेदारांना छळून छळून पैसे गोळा करत आहेत. करमाळा तालुक्यात वर्षभरात साधारणपणे सर्व योजनांमधून अंदाजे शंभर कोटी रुपयांच्या आसपास निधी येतो. उपअभियंता गायकवाड बी.एच. हे या निधीतून प्रत्येक कामासाठी एक टक्के घेतात म्हणजे वर्षभरात जवळपास एक कोटी रुपये टक्केवारीतून मिळवतात. तसेच तालुक्यातील एकोणीस गावे त्यांच्याकडे स्थापत्य अभियंता या पोस्ट साठी असल्यामुळे ती ५७ गावे देखरेखी खाली आहेत. या वीस गावांच्या कामाचे तीन टक्के ते कमिशन पोटी घेतात म्हणजे साधारण १ कोटी ७१ लाख होतात. म्हणजे उपअभियंता या पदाचे एक कोटी आणि स्थापत्य अभियंता या पदाचे १ कोटी ७१ लाख लाख असे मिळून २ कोटी ७१ लाख होतात.
त्यामुळे करमाळा तालुक्यातील कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. ठेकेदार आणि सरपंच हेलपाटे मारतात तेव्हा गायकवाड शुगर आणि बीपी चा त्रास आहे. म्हणून काम लांबनीवर टाकतात. परंतु टक्केवारी दिली की काम करतात अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्यांच्याकडील भ्रष्टाचाराची रक्कम शासनाने वसूल करून करमाळ्यातील शेतकऱ्यांना ठेकेदारांना व सरपंचांना न्याय द्यावा अन्यथा दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी विभागीय आयुक्त सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे पैसे वाटप आंदोलन केले जाईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे एका निवेदनद्वारे दिला होता.
त्यानुसार आज दुपारी १ वाजता विभागीय कार्यालय येथे संघटनेचे आंदोलन सुरु होण्यागोदर पोलिसांच्या मध्यस्थीने जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांची व विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बैठक ठरली. या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त सौरभ राव यांना सर्व हकीकत सांगितली .त्यानंतर सौरभ राव यांनी गांभीर्याने दखल घेत बी.एच. गायकवाड यांच्या वर त्वरित कार्यवाही करावी. यासाठी सीईओ सोलापूर यांना तातडीने आदेशवजा पत्र काढले.
यावेळी शर्मिला नलावडे, गणेश वायभासे, राहुल चव्हाण, राणा वाघमारे, अतुल राऊत, शरद एकाड, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, अजित सय्यद, रोहन नाईकनवरे, अक्षय देवडकर, सुहास फरतडे, हरिदास चव्हाण, मनोज साळुंखे उपस्थित होते.