मंगेशराव चिवटे यांचा सत्कार करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या वतीने करण्यात आला
करमाळा प्रतिनिधी
इंग्रजी माध्यमच्या शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू तथा आरोग्य विभागाचे कक्ष प्रमुख मंगेशराव चिवटे यांनी केले.यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच इंग्लिश स्कूल संघटनेचे अमोल सुरवसे, सचिव नीळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश स्कूल संघटनेची बैठक कुर्डुवाडी येथे घेण्यात आली होती.
यावेळी चिवटे यांचा सत्कार करताना करमाळा तालुका इंग्लिश स्कूल मेस्टा एफ संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार जयंत दळवी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोगे, कार्याध्यक्ष घाडगे सर, सदस्य तानाजी कर्चे, सदस्य युवराज बिले तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी संघटनेच्या वतीने इंग्लिश स्कूलच्या अडिअडचणी बाबत सदस्यांनी माहिती दिली तसेच शिक्षक मतदारसंघातून आवश्यक ते चिवटे यांना सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.चिवटे यांनी वरीष्ठ पातळीवरून इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
