मांजरगाव येथे संत तुकाराम महाराज यांचा ४१६ वा जयंतीउत्सव मोठ्या उत्साहात साजरा !
करमाळा प्रतिनिधी
वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ४१६ व्या जयंती उत्सवाचे मौजे मांजरगाव तालुका करमाळा येथे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. मांजरगाव येथे संत साहित्याचे अभ्यासक केंद्र असलेल्या जगद्गुरु तुकोबाराय
सार्वजनिक वाचनालयामध्ये 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मांजरगाव चे सुपुत्र मुंबई येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.हनुमंत ज्योतिराम हुंबे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक आणि जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी संत तुकारामांच्या जीवन चरित्रातील अनेकविध प्रसंगांचे सुलभ निरूपण केले. मकाई साखर कारखान्याचे सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष साहेबराव पाटील हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रभाकर मोरे, मांजरगाव ग्रा.पं.चे माजी सरपंच कल्याण मोरे सुनील चौधरी, प्रगतशील बागायतदार नवनाथ हुंबे, संभाजी ब्रिगेडचे नूतन तालुका उपाध्यक्ष रामहरी मोरे, राजेंद्र काळे, मा.आ. नारायण पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब तांबे,भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम खरात,अण्णासाहेब सोमनाथ इंगळे, धर्मराज खरात, महेबूब पठाण, सुरज खरात, दूध संस्थेचे चेअरमन हनुमंत हुंबे, धनंजय इंगळे, नवनाथ गडदडे, जेष्ठ नागरिक मल्हारी शिंदे दत्तात्रय मोहोळकरसर,
वाचनालयाचे उपाध्यक्ष रवींद्र जावळे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब नामदेव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या जयंती उत्सवामध्येच कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या एकत्रित जयंती उत्सवांचे नियोजन करून समाज प्रबोधनात्मक विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. गावामध्ये महापुरुषांच्या जयंती उत्सवात डीजे सारख्या विकृत आणि हिडीस वाद्यांचा उपयोग न करता वैचारिक प्रबोधन कार्यक्रमांचे नियोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. या समारंभासाठी जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सोमनाथ गरदडे व संभाजी ब्रिगेडचे रामहरी मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.