करमाळा प्रतिनिधी

महावितरणचा अजब कारभार ; वीज नाही, मीटर नाही, वीजबिल मात्र दहा वर्षांचे सव्वा लाख – शेतकऱ्यावर आली उपोषणास बसण्याची वेळ

जेऊर / महावितरणच्या बोंगळ व मनमानी कारभारामुळे करमाळा येथील शेतकरी नवनाथ थोरात यांना आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. करमाळा येथील रहिवाशी नवनाथ थोरात यांची तालुक्यातील गौंडरे येथील गट नंबर २५ मध्ये दोन एकर शेती आहे. यामध्ये शेतीला पाणीपुरवठा करण्याकामी वीज कनेक्शन मिळावे यासाठी थोरात यांनी महाराष्ट्र विद्युत कंपनीकडे दि. १७/११/२०१४ रोजी कोटेशन भरणा केला होता. त्यानुसार H.V.D.S योजने अंतर्गत डिपी बसवणे अभिप्रेत होते. तब्बल दहा वर्ष उलटून ही मात्र

आजतागायत पर्यंत संबंधित शेतकऱ्यास विज कनेक्शन दिले गेले नाही. याउपर न दिलेल्या विजेचे चक्क एक लाख एकवीस हजार नऊशे तीस रुपये बिल दिले आहे. आजपर्यंत अनेकवेळा महावितरणच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारूनही कोणीही अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन विज कनेक्शन दिले नसल्याने संबंधित शेतकरी थोरात यांच्यावर अखेर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. दिनांक 30/01/2024 रोजी मा. तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना उपोषणास बसण्याची परवानगी मागितली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *