
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पंचायत समिती मध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार शामलताई बागल यांच्या गटाची सत्ता असली तरी या दोन गटात बिनसलं असल्याचा दावा आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, करमाळा पंचायत समितीच्या माध्यमातून बागल गटाने दिग्विजय बागल यांचे नेतृत्व मजबुत करण्याचा डाव आखला. आणि यामुळेच बागलांच्या बंगल्यावर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठकांचे सत्र सुरू केले गेले. यात मग माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे सर्व सदस्य आणि उपसभापती अजित विघ्ने हे सुद्धा बैठकीला उपस्थित राहुन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली काम करु लागले होते.

परंतू अशातच शिंदे गटातील कार्यकर्त्यांना पंचायत समिती उपसभापती व सदस्यांनी बागलांसमोर शरणागती पत्करुन काम करण्यास सुरुवात केली हि गोष्ट पटली नाही. या नाराजीचा सुर अगदी थेट माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पर्यंत जाऊन पोहचला. यामुळे संजयमामा यांनी पदाधिकाऱ्यांची कान उघडली करुन बागलांच्या बंगल्यावर जाऊ नका असे सक्त आदेश दिले. यामुळे मग दिग्विजय बागल यांनी नंतर थेट पंचायत समिती मध्येच येऊन जनता दरबार सुरू केला. यावरुन या दोन गटात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचे कार्यकर्त्यांना समजले.
अशातच शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने दिग्विजय बागल यांच्या जनता दरबारात २०२९ मध्ये संजयमामा हेच आमदार होणार व दिग्विजय बागल यांच्या जनता दरबाराचा काही फायदा होणार नसल्याचे वक्तव्य केले. यावेळी प्रत्यक्ष दिग्विजय बागल व सदर कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन हे प्रकरण अगदी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्यात यावी या निर्णयापर्यंत गेले असल्याची जनतेत चर्चा सुरु झाली. करमाळा पंचायत समितीच्या कारभारात दिग्विजय बागल यांचा होणारा हस्तक्षेप उपसभापती अजित विघ्ने यांनी मान्य केला तरी सदस्य भरत अवताडे यांनी मात्र या हस्तक्षेपास कडाडून विरोध केला असल्याचे समजते. पंचायत समिती मध्ये अधिकाऱ्यांना दमदाटी करुन कमिशन खोरी वाढली असल्याचा थेट आरोप पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला असुन येत्या आमसभेत हा सर्व भ्रष्टाचार उघडा पडणार असा दावा ही तळेकर यांनी केला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
………….
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे वाटोळे करणारांचे हे आरोप आहेत आणि प्रवक्ते तळेकर वाचाळवीर आहेत हे सिद्ध झालेले आहे. वस्तुतः जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत बागल आणि शिंदे गटाची युती आणि जगताप गटाचा पाठींबा होता. आमचे सर्व पंचायत समिती सदस्य व नेतेमंडळी मधे समन्वय आहे. करमाळा तालुक्याच्या विकासकामांसाठी त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य आहे. विकासकामांवर चर्चेसाठी आम्हाला सर्वांकडे जावे लागते व यासाठी नेतेमंडळींची कसलीही आडकाठी नाही. पंचायत समितीचे कामकाज व्यवस्थित रित्या चालू असुन, तळेकरांची सर्व वक्तव्ये बिनबुडाची आहेत. त्यांनी आदिनाथ कारखान्याचा लिलाव झाला व का अपयशी ठरले यावर सध्या खरे स्पष्टीकरण दयावे- ॲड. अजित विघ्ने उपसभापती पं.स. करमाळा
…………..
वरिष्ठ पातळीवर जशी महायुतीची युती आहे त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यात भाजपा राष्ट्रवादीची युती आहे. त्याअनुषंगाने आम्ही माजी आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच बागल असे एकत्रितपणे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती व सत्ता मिळवली आहे. त्याअनुषंगाने आम्ही तालुक्यातील विकास कामे करीत आहोत सुनील तळेकर यांनी बिन बुडाचे आरोप करू नये आदिनाथच्या माध्यमातून सोन्याचा धूर काढणाऱ्यांकडुन साधा काळा धुर सुध्दा निघाला नाही आदिनाथ विकला आहे जनतेचे फसवणूक मा. आ. नारायण पाटील यांनी केली आहे – भरत आवताडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा सदस्य पंचायत समिती करमाळा