करमाळा प्रतिनिधी

उजनी धरण पाणी नियोजन अभावी २०१८-१९ साली -५९% (वजा ५९%) व २०२३-२४ साली -६१% (वजा ६१%) पर्यंत गेले होते, त्यावेळी उजनी धरणात प्रचंड गाळ व गाळमिश्रीत वाळू असल्याचे दिसून आले, उजनी धरण व बॅकवाॅटर परिसरातील गाळ अतिशय उच्च प्रतीचा असून हा गाळ शेतकरी बांधवांना दिल्यास शेतीतील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे तसेच हा गाळ व गाळमिश्रीत वाळू काढण्याने उजनी धरणातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.

उजनी धरणात ९९ कोटी ब्रास ६४,३५० कोटी रूपयाची वाळू;  तर ६० कोटी ब्रास गाळ आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सध्या वाळूचा ६५० रू. ब्रास दर असून याच हिशोबाने उजनी धरणात ९९,००,००,००० ब्रास वाळू (९९ कोटी ब्रास) × ६५० रू. १ ब्रास वाळूचा शासकीय दर गृहीत धरला तर या वाळूचा शासकीय दर ६४३५०,००,००,००० रू (६४३५० कोटी रू) होत आहे, यातील पैशातून उजनी बॅकवाॅटर परिसरातील अपुर्ण राहिलेले सर्व प्रकल्प पुर्ण होण्यास मदत होणार आहे. केळी पिकाच्या निर्यातीतून भारतास केळी पिकातून सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणाऱ्या उजनी बॅकवाॅटर परिसरातील ग्रामीण रस्त्यांची प्रचंड वाईट अवस्था झाली असून यातुन चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करून ते रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडले पाहिजेत. अशी मागणी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *