
करमाळा प्रतिनिधी
श्री मकाई सहकारी साखर कारखाना लि., भिलारवाडी, पो. जिंती, ता. करमाळा, जि. सोलापूर या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असल्याची माहिती नोटीसद्वारे देण्यात आली आहे.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त कायम करणे, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील संचालक मंडळाच्या कामकाजाच्या अहवालास मान्यता देणे, लेखापरीक्षण अहवाल, नफा-तोटा पत्रक व ताळेबंदास मंजुरी देणे तसेच अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
सन २०२४-२५ च्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे, दोषदुरुस्ती अहवाल स्वीकारणे, सन २०२६-२७ चे महसुली व भांडवली अंदाजपत्रकास मंजुरी देणे, वैधानिक लेखापरीक्षक, अंतर्गत लेखापरीक्षक, जीएसटी सल्लागार, जीएसटी ऑडिटर, इन्कमटॅक्स सल्लागार व टॅक्स ऑडिटर यांची नियुक्ती करणे आदी विषय सभेपुढे ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय आगामी गळीत हंगाम यशस्वीपणे चालविण्यासाठी बँका व विविध वित्तीय संस्थांकडून कर्जपुरवठा उपलब्ध करून घेण्याबाबतही सभेत चर्चा होणार आहे. सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक एच.पी.खाटमोडे यांनी केले आहे.