
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील सुभाष चौकाचे नामांतर करून त्याचे नामकरण “श्रीराम चौक” असे करा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी आज आपल्या निवदन पत्राने करमाळा नगर पालिकेचे चे मुख्याधिकारी लोंढे यांच्या कडे केली आहे.

निवेदनात २२ जानेवरी रोजी प्रभु श्रीराम जन्मभुमी तिर्थक्षेत्र आयोध्या येथे होत असलेल्या रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमीत्त करमाळा येथील सुभाष चौक येथे करमाळ्यातील हजारो रामभक्त, रामसेवक त्यांच्या भावना व अस्मितेचा प्रश्न

म्हणून करमाळा येथील सध्याचे चालु नाव सुभाष चौक या ठिकाणी हिंदुधर्म प्रेमी हे खुप मोठ्या स्वरूपाचा यज्ञ करून त्या ठिकाणी रामललाचे प्राणप्रतिष्ठापनाचे प्रत्यक्ष दर्शी होणेकामी व स्वागताकामी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

वर नमूद प्रमाणे सुभाष चौक असे नाव असून सदर चौकाचा इतिहास पाहिला असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सुभाष चौक नामकरण झालेबाबतचा अथवा तसे कारण असण्याचा कुठलाही कागदोपत्री अथवा प्रचलित पुरावा उपलब्ध नाही. अशा

परिस्थितीमध्ये तसेच वर नमुद रामललाचे प्रतिष्ठापनेचे शुभ मुहूर्तावर आपणाकडून सदर अर्जाचा विचार होवून सुभाष चौकाचे नामांतर होवून श्रीराम चौक असे नामकरण होणेबाबत आदेशीत व्हावे अशी मागणी केली आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जितेश शेठ कटारिया, ॲड.प्रियाल अग्रवाल, पत्रकार विशाल घोलप, व्यापारी असोशियनचे स्नेहल कटारिया, कपिल मंडलिक आदी उपस्थित होते.
विवीध सामाजिक व राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदनावर स्वाक्षरी केली.

