करमाळा प्रतिनिधी

सिडको महामंडळ, नवी मुंबई येथे कार्यरत असलेले संतोष सुधाकर ओंभासे यांची अतिरिक्त मुख्य अभियंतापदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संतोष ऑभासे यांनी सिडको महामंडळात तब्बल ३२ वर्षे ६ महिने प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवा बजावली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या प्रदीर्घ अनुभव, कार्यतत्परता आणि प्रशासकीय कौशल्याची दखल घेत त्यांची अतिरिक्त मुख्य अभियंता पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल बजरंग राजाराम भिंगारे, नरेंद्रकुमार बजरंग भिंगारे (करमाळा) तसेच देविदास बबन वाडेकर (पेण) यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पदोन्नतीमुळे करमाळा व पेण परिसरातील नागरिकांनीही आनंद व्यक्त केला असून, त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संतोष ऑभासे यांनी नुकताच अतिरिक्त मुख्य अभियंतापदाचा पदभार स्वीकारला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *