करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस रेझींग डे कौमी एकता चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी केले होते. पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली

करमाळा येथील जिन मैदानावर भरविण्यात आले होते. याचे करमाळा कोर्टचे जज राजू शिवरात्री यांनी उद्घाटन केले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी भेट दिली. करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस

निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, टेंभुर्णी पोलीस निरीक्षक दीपक पाटील, कुर्डूवाडी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व शांतता कमिटीचे पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या स्पर्धेत करमाळा सुपर जायंट्स, करमाळा किंग्स, कुर्डूवाडी

वॉरियर्स, कुर्डूवाडी इंडियन्स, टेंभुर्णी कमांडोज, टेंभुर्णी ईगल्स, करमाळा रायडर्स, करमाळा चॅलेंजर्स या आठ संघांनी सहभाग घेतला होता.

…..

करमाळा उपविभागातील सामाजिक एकता वृद्धिंगत होण्यासाठी समाजातील सर्व घटकातील (धर्म,जात) युवकांना प्रोत्साहन देऊन पोलीस व समाजातील संबंध दृढ होण्याकरिता केलेला प्रयत्न आहे – अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी,करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *