
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्रात सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका असून केवळ दहा हजार रुपये मानधनावर या काम करत असून कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन या अंगणवाडी सेविकांनी कर्तव्य पार पाडले अशा अंगणवाडी सेविकांना किमान 21 हजार रुपये

महिना पगार द्यावा व त्यांच्या पगार पत्रकारावरील मानधन शब्द वगळून त्या जागी वेतन शब्दाची रचना करून शासन दरबारी कायमस्वरूपी सेवक करून घ्यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली.

4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी सेविकांचा राज्यभर संप सुरू आहे. करमाळ्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची शिवसेना कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अंगणवाडी सेविका अध्यक्ष सुनीता शिंगाडे, भक्ती

काळे, मोनिका पलंगे, अर्चना कांबळे, वैशाली कदम, रेणुका शहाणे, शोभा धुळेकर, उषा हंडे, मनीषा मांडवी, अर्चना सुपेकर, ज्योती काळे, सुजाता गाठी, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

अंगणवाडी मदतनीस ला केवळ पाच हजार पगार आहे तर सेविकेला दहा हजार महिना पगार आहे. या महागाईच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे. त्या काम करणाऱ्या महिला विध्वपरितक्ते आहेत. यांना स्वतःच्या

कुटुंब चालवण्यासाठी याच रोजीवर जगावे लागते. यामुळे तात्काळ मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली.
बोलताना महेश चिवटे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री असून अंगणवाडी सेविकांचा प्रश्न ते निश्चित मार्गे

लावतील लवकरच अंगणवाडी सेविकांचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्री यांची बैठक लावून देऊ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लहान मुलांचे शिक्षण बंद पाडण्याचे काम संघटनांनी करू नये.

यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनाचे कायमस्वरूपी कर्मचारी करण्याची मागणी शिवसेनेच्या कोर कमिटीत करणार असल्याची माहिती दिली.