करमाळा प्रतिनिधी


आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावर व कामगार आणि सभासदांच्या मालकीचाच राहणेबाबत व इतर मागण्यांबाबत पत्र देऊनही त्या पत्रावर कोणतीही कार्यवाही न होता खुलासा न केल्यामुळे दि.०७/०७/२०२६ पासुन आदिनाथ कारखान्यासमोर आमरण उपोषण करीत असलेबाबतचे निवेदन उदयसिंह देशमुख यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात असे सांगितले आहे की, उपरोक्त विषयास अनुसरुन विनंती अर्ज सादर करतो की, आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा परिसरातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक हिताशी निगडित महत्त्वाचा उद्योग आहे. सदर कारखाना लिलाव प्रक्रियेद्वारे विक्रीस काढल्यास शेतकरी सभासदांचे हित बाधित होण्याची तसेच परिसरातील रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता आहे.


कारखाना हा सहकारी तत्वावरच चालविण्यात यावा, कामगारांच्या थकीत पगारी त्यांना अदा करण्यात याव्यात, ऊस वाहतुकदाराची राहिलेली देणे देण्यात यावी, चालु गळीत हंगामात कारखाना त्वरित सुरु करण्यात यावा, एफ.आर.पी.प्रमाणे दर जाहीर करण्यात यावा, तसेच कारखान्याचे संचालक व चेअरमन यांनी सभासद व कामगार यांना विश्वासात न घेता कारखाना भाडेतत्वावर व विक्रीस का काढला याचा खुलासा एम.डी. व चेअरमन यांनी लेखी स्वरुपात देण्यात यावा, जर तुम्ही कारखाना करारात देणार असाल तर मागील कामगारांची देणी कसे अदा करणार ते लेखी स्वरुपात द्यावे अशा प्रमुख मागण्या आहेत.
तरी वरीलप्रमाणे सर्व मागण्यावर आपले स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करणेबाबत व सदरील मागण्यांवर पुढील ४ दिवसांत योग्य ती कार्यवाही करुन संबंधितांकडून खुलासा न आलेस मी कारखान्यासमोर उपोषण करणार आहे असे लेखी पत्र दिलेले होते. परंतु मी पत्र देऊन ४ दिवस होऊन गेले तरी देखील आमच्या मागण्यांबाबत कोणत्याही प्रकारचा खुलास न झाल्यामुळे मी दि. ०७/०७/२०२६ रोजी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे गेटसमोर आमरण उपोषणास बसणार आहे याची आपण नोंद घ्यावी.


पोलीस निरीक्षक करमाळा, चेअरमन आदिनाथ सहकारी साखर कारखाना, कार्यकारी संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगाव यांना माहितीस्तव प्रत देण्यात आले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *