करमाळा प्रतिनिधी

  सोलापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम सध्या जोरात सुरू असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जात आहे परंतु जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल इतर अनेक बँका असतील पतसंस्था असतील यांची वसुलीची यादी कारखान्याला

देऊन कारखानदाराला मध्यस्थी करून बँकांकडून पठाणी वसुली सुरू आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले असून महाराष्ट्र सरकारची वसुली करण्यास सक्त मनाई असून तरीसुद्धा जिल्ह्यात अनेक

बँका त्यातल्या त्यात जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक कारखान्यांना यांच्या वसुलीची यादी देऊन मनमानी प्रकारे वसुली करत आहे.

  गेल्या दीड दोन वर्षाच्या काळात सोलापूर जिल्ह्यात दोन-तीन वेळा झालेले अवकाळी परिस्थिती आणि सध्या उजनी धरणात असलेले 16 टक्के पाणी याचा विचार करता सोलापूर जिल्ह्यावर सध्या फार मोठे दुष्काळाचे सावट असून महाराष्ट्र

शासनाच्या यादीत सुद्धा जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त यादीत आहेत त्यामुळे सध्या होत असलेली वसुलीही अवैधरित्या होत असून ती तात्काळ थांबवण्यासाठी प्रहारच्या माध्यमातून आज जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

 वसुली तात्काळ थांबून शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास प्रहारच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधक कार्यालय याच्यावर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळेस देण्यात आला.

  यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खालीद मणियार, जिल्हा उपाध्यक्ष रोहित साठे, करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, दक्षिण कार्याध्यक्ष तयापा कोळी यांच्यासह अनेक प्रहार कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *