करमाळा प्रतिनिधी

जि. प. शाळा कोर्टी गावातील शाळा व्यवस्थापन समिती गठीत करताना योग्य प्रमाणात सर्व घटकांना व वर्गनिहाय प्रतिनिधित्व दिले गेले नाही. सर्व पालकांना पत्र दिले होते परंतु, तेवढा कालावधी दिला गेला नाही. तसेच विद्यमान अध्यक्ष यांचे बंधू उपसरपंच आहेत. तसेच विद्यमान अध्यक्ष यांनाच पुन्हा अध्यक्ष होण्याची तीव्र इच्छा आहे. त्या पद्धतीने नियोजन

केल्याचे दिसून आले आहे. चुकीच्या पद्धतीने सदस्य निवड करण्यात आली, त्यानंतर केंद्रप्रमुख यांना मुख्याध्यापक यांनी अध्यक्ष निवडीसाठी बोलवले होते. परंतु आमची मूळ तक्रारच सदस्य निवडीची असल्यामुळे अध्यक्ष निवडीचा विषयच येत नाही, परंतु  विद्यमान अध्यक्ष यांनी तशी रचना करून रात्रभर सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन दबाव तंत्राचा वापर करून स्वतः

अध्यक्ष झाल्याचे मेसेज मीडियावर पसरवले आहेत. अशी निवड झाली नाही झालेली सदस्य निवड व अध्यक्ष निवड नियमाला डावलून केली आहे. त्यामुळे आपल्याकडे आम्ही तक्रारी अर्ज देत आहे. सदर अर्ज लवकर निकाली काढावा व न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मिळवावा लागेल. असे सही करणारे

दिलीप शेरे, दीपक माने, हनुमंत नवले, सुरज टेके, सचिन गिरी, किरण मेहेर, अविनाश फुटाणे, गणेश क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर, प्रज्ञाली साळवे, राजेंद्र शिंदे, संदीप चव्हाण, समीर शेख, सचिन नवले.आदीजणांनी सही केली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *