
स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्याच्या माथी खापर फोडण्याचा दिग्विजय बागल यांचा प्रयत्न. – प्रा रामदास झोळ
मकाई साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेवर नाराजी व्यक्त करून प्रा रामदास झोळ यांनी बोलताना सांगितले चेअरमनने व्यवस्थित भाषण करून व्यवस्थित पणे मुद्दे मांडायला पाहिजे होते, विद्यमान चेअरमन पेक्षा माझी चेअरमनच जास्त बोलत होते. पुढील गाळप कसे करणार आहेत याविषयी कुठलेही भाष्य केले नाही ,तसेच शेतकऱ्यांच्या बिलाविषयी ठाम असे काहीही सांगितले नाही .आधी तीस तारीख दिली होती नंतर परत ठाम काहीही सांगितले नाही. जर काही चुकीच्या गोष्टीं करत असतील तर मी कोर्टात जाणार आहे असे म्हणाल्यावर संचालक मंडळाला कशाची एवढी भीती वाटत होती ,त्यांनी एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी मागितला होता? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. चुकीचे काम करणाऱ्यालाच मोठी भीती असते असे त्यांनी यावेळी सांगितले, आपली भूमिका ही शेतकऱ्यांचे पैसे मिळावे व सहकार टिकून राहावा यासाठी आपण कायम प्रयत्नशील आहोत. कारखाना हा कुणाच्या मालकीचा नसून सभासदांच्या मालकीचा आहे . काही दोन-चार जवळचे लोक पुढे बसवून, विषय मांडून त्यांच्याकडून हात वर करून घेऊन विषय मंजूर केले असा आरोपी त्यांनी यावेळी केला. तसेच ही सभा लोकशाही पद्धतीने झाले नसून, ती सभा गुंडाळण्यात आली असा आरोपी ही त्यांनी केला . या सभेविषयी बोलताना झोळ सर म्हणाले की दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यांची बिले कधी देणार, वाहतूकदारांची देणे कधी देणार, चालू हंगामाला कारखाना सुरू करणार की नाही, गाळप झालेल्या उसापासूनची साखर काय केली, बघ्यास मोलॅसिस यांचं काय केलं, हे विकलं असेल तर त्याचे पैसे काय केले या विषयावर बोलणे अपेक्षित होते परंतु त्यांनी यावर न बोलता कुणाच्यातरी सांगण्यावरून बँकेने आम्हाला कर्ज दिलं नाही आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांची बिल देऊ शकलो नाही असं सांगितलं. यामध्ये सरळ सरळ त्यांनी आपलं अपयश झाकून दुसऱ्याच्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. माझी भूमिका आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावरच चालावा अशी होती तीच भूमिका मकाईच्या बाबतीतही आहे मकाई व्यवस्थित चालवला तर माझे त्यासाठी सहकार्य राहील. परंतु मकाई अडचणीत यावा अशी आपली भूमिका कदापिही नाही. परंतु दिग्विजय बागल यांना एक हाती सत्ता असतानाही सहकारी तत्त्वावरील कारखाना व्यवस्थित चालवता आला नाही. आज हे पूर्ण तालुक्याने पाहिले आहे आणि हे त्यांचे खूप मोठे अपयश आहे. हे अपयश झाकण्यासाठी आजच्या सभेमध्ये त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसला.
