करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेसमोरील किल्ला विभागातील श्री गणपती मंदिर परिसरात सार्वजनिक बोअरवेल पाडून देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक पिलू इंदलकर, संतोष सापते, संताजी घोरपडे, सागर दळवी, चैतन्य पाटील, आदीजण उपस्थित होते.


श्री गणपती मंदिर हे करमाळा शहरातील प्रसिद्ध व प्राचीन धार्मिक स्थळ असून येथे दररोज मोठ्‌या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थी दिवशी भाविकांची मोठी गर्दी होत असते. याशिवाय आषाढी व कार्तिकी वारीच्या काळात पालखी सोहळा व वारकरी या परिसरात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते.

मंदिर परिसर व गल्लीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले असून त्या झाडांच्या संगोपनासाठी नियमित पाण्याची आवश्यकता आहे. तसेच सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे किल्ला विभागातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे.
श्री गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान गल्लीतील कार्यकर्त्यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी स्वयंपाक, पिण्याचे पाणी, स्वच्छता व इतर आवश्यक कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे या परिसरात कायमस्वरूपी पाण्याची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून करमाळा नगरपरिषदेसमोरील किल्ला विभागातील श्री गणपती मंदिर परिसरात सार्वजनिक हितासाठी तातडीने बोअरवेल पाडून देण्यात यावी, जेणेकरून परिसरातील नागरिक, भाविक, वारकरी तसेच वृक्षारोपणासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *