करमाळा वीज अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार – अध्यक्ष अल्ताफ तांबोळी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा वीज कर्मचाऱ्यांचा सध्या अनागोंदी कारभार चालू आहे वीजे संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशारा माजी नगरसेवक तथा मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष अल्ताफशेठ तांबोळी यांनी दिला आहे.
तांबोळी म्हणाले की, गेले कित्येक दिवस झाले दिवसातून पाच-सहा वेळा लाईट जाते विज गेल्याने शहरातील व्यापारी ,ऑनलाइन सेंटर वाले ,शासकीय कर्मचारी यांचे काम ठप्प होते तालुक्यातील 50 50 किलोमीटर वरून शहरात कामे करण्यासाठी शेतकरी गावकरी येत असतात शहरात आल्यानंतर वीज नसते वीज नसल्यामुळे अनेक कामे अडकून राहतात करमाळा शहरातील वीज अधिकारी अंदाधुंदी कारभार करत आहे योग्य ते नियोजन करून वीज गेली नाही पाहिजे याबाबत काय करता येईल याचे नियोजन करावे अन्यथा वीज कार्यालयावर मोठे आंदोलन छेडू असा इशारा माजी नगरसेवक अल्ताफ शेठ तांबोळी यांनी दिला आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *