पोथरे-मांगी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवावेत;अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा फुकटचा सल्ला देऊ नये :- नितीनभाऊ झिंजाडे

करमाळा प्रतिनिधी

पोथरे-मांगी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची मागणी भाजपचे नितीनभाऊ झिंजाडे यांनी केली आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, गेल्या 15-20 दिवसापासून बिबट्याचा वावर जातेगांव,पोथरे, मांगी परिसरात

जाणवत आहे. काल बिबट्या पोथरे मांगी परिसरात लोकांना दिसल्याने परिसरातील गावात एकच खळबळ उडाली आहे. लोकांना शेतीची कामे करण्यासाठी शेतात जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी

बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे. वन विभाग मात्र बिबट्याला जेरबंद करण्याचे सोडून लोकांना सतर्क राहण्याचा फुकटचा सल्ला देऊन मनुष्यहानी होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल झिंजाडे यांनी उपस्थित केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *