कमलाई नगरी
पडसाळी वि.वि.का.सेवा सोसायटी पडसाळीच्या चेअरमनपदी नारायण गणपत मुटकुळे यांची निवड…
पडसाळी वि.वि.का.सेवा सोसायटीची चेअरमन निवड प्रक्रिया शांत वातावरणात ग्रामपंचायत कार्यालय पडसाळी येथे पार पडली. यावेळी पडसाळी वि. वि. का. से. सोसायटीच्या नुतन चेअरमनपदी श्री. नारायण मुटकुळे यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. बाळु थोरात यांची निवड झाली. माजी चेअरमन श्री. दादासाहेब देशमुख व व्हा. चेअरमन श्री. तुकाराम सलगर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ही निवड सर्वानुमते करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन कोळी साहेब व सेक्रेटरी राऊत भाऊसाहेब यांनी काम पाहिले.
यावेळी सोसायटीचे संचालक दादासाहेब देशमुख, तुकाराम सलगर, आण्णासाहेब मुटकुळे, गणपत मुटकुळे, विजयकुमार फरड, बालाजी फरड, शारदा अदिनाथ मुटकुळे, अनिता लक्ष्मण देशमुख हे उपस्थित होते.
यावेळी सरपंच योगेश पाटील, दत्ता नाना फरड, सचिन पाटील, कुर्मदास पाटील, गोपिनाथ मुटकुळे, मच्छिंद्र मुटकुळे, जालिंदर पाटील, उपसरपंच विष्णु फरड, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब मुटकुळे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत देशमुख, तानाजी देशमुख, महेश पाटील, महावीर मुटकुळे, दत्तात्रय देशमुख, रामभाऊ सलगर, संतोष पाटील, प्रवीण पाटील, प्रकाश पाटील, अनुरथ पाटील, निलेश शिंगाडे, बापू सलगर, नामदेव मुटकुळे, सदाशिव जगदाळे, भारत सुतार, भिकाजी थोरात, नारायण थोरात, हनुमंत देशमुख, लक्ष्मण देशमुख, महादेव पाटील, सुकुमार मुटकुळे, संजय मुटकुळे, पिंटू सलगर, सिध्देश्वर देशमुख, परेश देशमुख, अक्षय पाटील, शुभम मुटकुळे, संतोष थोरात, यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर पेढे वाटुन गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच चेअरमन व्हा. चेअरमन यांना अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या