‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम जिंती महसूल मंडळात साजरा करण्यात आला.

करमाळा प्रतिनिधी

‘महसूल सप्ताह’ च्या निमित्ताने आज दि.05 ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम जिंती महसूल मंडळात साजरा करण्यात आला.या उपक्रमांतर्गत आज आजी-माजी सैनिक यांच्या घरी भेट देवून त्यांच्या प्रती देश सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.तसेच त्यांच्या ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय,मंडळ अधिकारी कार्यालयात काही कामे असतील तर

त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शासन आपल्या प्रती संवेदनशील असल्याचे मंडळ अधिकारी संतोष गोसावी यांनी सांगितले.

आज मौजे जिंती येथील तानाजी भीमराव वारगड, नंदलाल हरिभाऊ भोसले, महादेव गणपत जानभरे, दादासाहेब गोपाळ भांगिरे यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देवून त्यांना त्यांचा सातबारा व आठ अ उतारा सन्मानपूर्वक देण्यात आला. मतदान केंद्र

स्तरीय अधिकारी यांनी देखील घरोघरी सर्व्हे च्या संबंधाने या माजी सैनिक यांची प्रत्यक्ष घरी  भेट देवून नवीन नाव नोंदणी तसेच दुरूस्ती संबंधी चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली. तसेच टाकळी (रा) येथील माजी सैनिक दिलीप भारत गुळवे व खातगाव नं 2 येथील तात्यासाहेब जगन्नाथ मोरे यांची भेट तलाठी रामेश्वर चंदेल यांनी घेवून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. कोंढारचिंचोली येथील अरूण गणपत गोडगे व भरत गणपत गोडगे या देश सेवा करणा-या सख्या दोन भावांची भेट घेवून त्यांच्या जमिनीचे अभिलेख त्यांना सुपूर्द करण्यात आले.

‘सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम जिंती मंडळात यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी जिंती संतोष गोसावी, तलाठी जिंती प्रबुद्ध माने, तलाठी कोंढारचिंचोली सोमनाथ गोडसे, तलाठी टाकळी (रा) रामेश्वर चंदेल, तलाठी रामवाडी संजय शेटे, तलाठी हिंगणी राहुल बडकणे, जिंती मतदान केंद्र स्तरीय अधिकारी नीळकंठ शेळके, अविनाश नेवसे, जिंती सरपंच प्रतिनिधी श्यामराव ओंभासे, कोंढारचिंचोली माजी सरपंच देविदास साळुंके, पुरूषोत्तम जाधव, कमाल मुलाणी यांचे सहकार्य लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *