करमाळा प्रतिनिधी

सोमवारी दि. 25/08/2026 रोजी ग्रामसभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या ग्रामसभेत वयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती सरपंच रविदादा वळेकर यांनी दिली. यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांचे कडील पिठाची गिरणी, पिकोफॉल मशीन, 5 वी ते 12 वी मुलींना सायकल चे अर्ज, कांडप यंत्र,10 वी पास महिलांना संगणक प्रशिक्षण इत्यादी योजनांची माहिती दिली.

तसेच दिव्यांग बांधवांना शेळीपालन गटखरेदी, झेरॉक्स मशीन, ई-बाईक, अतितीव्र (80% पेक्षा जास्त) दिव्यांग पाल्यांच्या पालकांना मदत/अनुदान, दिव्यांगांना अन्न व खाद्य वाटप या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, दिव्यांग स्वयंसहायता समूह यांना व्यावसायाकरिता अर्थसाहाय्य, पिठाची गिरणी आदी योजणांची माहिती दिली.

घरकुलाची प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचा सर्व्हे झालेली यादी वाचून ग्रामसभेची मंजुरी घेतली. तसेच ज्यांना आजपर्यंत घरकुल मिळाले नाही, त्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट केली. विकसित भारत रोजगाराची हमी व आजीविका अभियान ग्रामीण V.B.G. RAMG अंतर्गत गावविकास आराखडा तयार करणे, फळबाग लागवडीचे लाभार्थी निवडणे आदी विषयावर चर्चा झाली. पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 चे तालुका स्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस रक्कम शिल्लक आहे. त्यावर मार्गदर्शन सूचनेनुसार कामे करायचे ठरले. आयत्या वेळी आलेल्या विषयावरही चर्चा झाली. अतिक्रमण, ग्रामविकास संबंधी विकासकामे, पुढील नियोजन आदी विषयावर चर्चा झाली.

ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रविदादा वळेकर होते तर सचिव पदी लिपिक दिलीप मुळे यांनी काम पहिले. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा बहिष्कार असल्याने लिपिक यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती.

या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य,  ग्रामस्थ, युवक,आजी माजी पदाधिकारी,कृषी सहाय्यक अधिकारी महेश कोकरे, सरकारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *