
करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे पाच महिन्यापासून मंजूर झाली नव्हती तेव्हा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी प्रकरणे मंजूर करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता याची दखल घेऊन तसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी संजय गांधी शाखेचे अधिकारी काजी व दीक्षित यांना तातडीने प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. सूचनेचे पालन करून प्रकरणे मंजूर करण्यासाठी छाननी करण्यात आली व प्रकरने मंजूर केली परंतु काही पात्र प्रकरणे कदाचित नजरचुकीने त्रुटी दाखवण्यात आली. त्रुटी दाखवण्यात आलेल्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये तहसीलदार मॅडम यांच्याशी चर्चा करून व आर्जदारांना तत्काळ त्रुटी ची पूर्तता करायला सांगून तहसीलदार मॅडम यांनी चालू मंजूर यादीत घेण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे. तेंव्हा त्रुटीत प्रकरणे असलेल्या अर्जदारांनी आठ दिवसाच्या आत त्रुटीची पूर्तता करावी असे आवाहन राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
