करमाळा प्रतिनिधी  

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फंड यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार महाविद्यालयात नागपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्वाती माने, मीना किर्दाक व संध्या बिले या होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने होते तर प्रमुख उपस्थितीत प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक हे होते.

नागपंचमी हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असून जुन्या पारंपारिक खेळाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य जपणारा व निसर्गशी जवळीक साधणारा सण आहे. याप्रसंगी विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध पारंपारिक खेळांच्या आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने झिम्मा, फुगड्या, फेर, झोका, काटवटखाना, अभिनय व नृत्य इत्यादी समावेश होता. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहाने बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच इयत्ता अकरावी मधील मोहिनी रंधवे, अर्चना अडागळे, श्वेता आडेकर यांनी पारंपरिक नृत्य सादर केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या महाविद्यालयात गेल्या पाच वर्षापासून विद्यार्थिनी साठी बाराही महिने झोके उपलब्ध असतात. महाविद्यात असणाऱ्या निर्भया गार्डन मधील या झोक्याचा आनंद मुली रिकाम्या वेळेत निर्भयपणे घेतात.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेखा जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. मुक्ता काटवटे यांनी केले. तर आभार प्रा. सुवर्णा कांबळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सुजाता भोरे,प्रा. नीता माने, प्रा. पल्लवी टोणपे, प्रा. रूपाली शिंदे, प्रा. स्वाती मोरे, प्रा. स्वाती नलावडे, प्रा. त्रिवेणी मोरे, प्रा. आश्विनी अडसूळ, प्रा. अनिता अधोरे,  अनिता देशमुख, प्रा.सरला चव्हाण, राजश्री शिंदे, भाग्यश्री खटके व मेघा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *