सोलापूर, दि. 1 (जि. मा. का.) : शासन परिपत्रक दि.26 सप्टें.2012 अन्वये जिल्हास्तरीय लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो.  या दिवशी जनतेच्या तक्रारी गाऱ्हाणी ऐकण्याकरीता त्या त्या विभागातील विभागप्रमुखांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

तरी माहे ऑगस्ट 2023 चा लोकशाही दिन दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केला असून सर्व विभाग प्रमुखांनी  आपलेकडील मागील महिन्यातील प्रलंबित निवेदन / अर्ज माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अर्ज ,  आपले

सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही इ. माहितीसह  सकाळी 10 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे उपस्थित रहावे. तसेच लोकशाही दिनास विनापरवानगी गैरहजर राहता येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी कळविले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *