करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथे इंग्रजी भाषा वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण प्रसंगी  प्रा.करे- पाटील यांचे प्रतिपादन झाले. स्व. लीलाताई दिवेकर यांचे स्मरणार्थ करमाळा येथे तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी करे-पाटील बोलत होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. करे पाटील म्हणाले की, जागतीकीकरणाच्या आधुनिक युगात भिन्न भाषा असणाऱ्या देशांत सर्व भाषांचा दुवा म्हणून इंग्रजी भाषेकडे पाहिले जाते. त्यामुळे चरितार्थ चालवण्यासाठीही इंग्रजी ही आवश्यक भाषा आहे, त्यामुळे  संधी निर्माण करून देणारी भाषा म्हणून इंग्रजी महत्वाची आहे.

यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा, शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळा अशा एकूण 74 शाळांतील दोनशे पंचवीसहून अधिक निवडक स्पर्धकांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. करमाळा शहरासह ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचा इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेस उदंड प्रतीसाद लाभला.

स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा, तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषण व संभाषण कौशल्य व सभाधीटपणा विकसित व्हावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.

इ.पाचवी / सहावी प्रथम गट, इ. सातवी-आठवी  दूसरा गट तर तिसरा गट इ. नववी-दहावी च्या विद्यार्थ्यांचा होता बक्षीस वितरण यशकल्याणी सेवाभवन येथे गटशिक्षण अधिकारी राजकुमार पाटील,  ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. बाबुराव हिरडे,  विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, विस्ताराधीकारी सुग्रीव नीळ, थोरड मॅडम, जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मुंचडे इ. प्रमुख पाहुण्यांचे  हस्ते करण्यात आले. पत्रकार बांधव या समारंभास उपस्थित होते.    

विजेत्या स्पर्धकांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच करमाळा तालुक्यातील माध्यमिक शाळेच्या इ.10 वीच्या बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून पालकांसह गौरव करण्यात आला. इंग्रजी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांचा यश कल्याणी संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून प्रा. करे- पाटील यांनी सन्मान केला.

विद्यार्थी इंग्रजी भाषा व व्यक्तीमत्व विकासासाठी करमाळा तालुक्यात शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असे, इंग्लीश टीचर्स असोसिएशनचे प्रमुख सल्लागार,  यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. करे-पाटील यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *