सोलापूर दि.25 ( जि.मा.का.) :- सुब्रतो मुखर्जी शालेय जिल्हा फुटबॉल क्रीडा स्पर्धा शासकीय मैदान नेहरु नगर येथे  उत्साहात संपन्न झाल्या. फुटबॉल क्रीडा स्पर्धेत  सेट जोसेफ स्कूल, बार्शी, ग्रीन फिंगर्स हायस्कूल, अकलूज व एम आय टी विश्वशांती गुरुकुल केगांव संघ विजेते ठरले.

            जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर, सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने शासकीय मैदान नेहरु नगर येथे  फुटबॉल क्रीडा स्पर्धाचे करण्यात आले होते. या  क्रीडा स्पर्धाचे

उद्घाटन जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव डॉ. किरण चौगुले, शारिरीक शिक्षण संचालक प्रा. आनंद चव्हाण, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव तसेच पंच प्रमुख किरण दुस्तगर आदी उपस्थित होते.

सेंट जोसेफ स्कूल बार्शी ने 14 वर्षाच्या मुलांच्या गटात इडियन मॉडेल स्कूल अक्कलकोटच्या संघाचा 2.0 ने पराभव करत विजेतेपद पटकाविले. सेंट जोसेफ चे खेळाडू ओजंस मांजरे व आरहम ललवाणी यांनी प्रत्येकी 01 गोल केला. एम आय टी विश्वशांती गुरुकुल केगांव ने 17 वर्षाखालील मुलीच्या गटात कु. मौंली पुराणी व स्नेहा राऊत यांच्या प्रत्येकी 01 गोल ने

सिंहगड पब्लिक स्कूलचा 2.1 ने पेन्ल्टीने स्ट्रोक वरती पराभव करुन विजेतेपद पटकाविले. 17 वर्षे मुलांच्या गटात ग्रीन फिगंर्स हायस्कूल अकलूजने महाराष्ट्र विदयालय बार्शी संघाचा 2.0 ने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. ग्रीन फ्रिगर्स चे खेळाडू समर्थ खडके व श्रेयस मुळीक यांने प्रत्येकी 01 गोल केला.

         यावेळी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *