सोलापूर दि.24.(जि.मा.मा.) :- जिल्हयातील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात शालेय क्रिडा स्पर्धा व क्रिडा विषयक कार्यक्रम आयोजनाबाबत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या मार्फत दिनांक 25 जुलै ते  01 ऑगस्ट 2023 या कालावधीत तालुकानिहाय  क्रिडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन  करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी  दिली.

दिनांक 25 जुलै 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता  तालुका क्रीडा संकुल अक्कलकोट,  दुपारी 4.00 वाजता जिल्हा क्रिडा संकुल कुमठा नाका,सोलापूर, दिनांक 26 जुलै 2023 रोजी  10.00 वाजता नागनाथ विदयालय, मोहोळ, दुपारी 2.00 वाजता

आदर्श पब्लिक स्कुल कुर्डूवाडी ता. माढा, दिनांक 27 जुलै 2023 रोजी  सकाळी 10.00 वाजता शिवाजी कॉलेज बार्शी, दुपारी 2.00 वाजता अण्णासाहेब जगताप विदयालय करमाळा,  दिनांक  28 जुलै 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सिंहगड पब्लिक

स्कुल  कमलापूर, सांगोला, दुपारी 2.00 वाजता न्यू इंग्लिश स्कुल मंगळवेढा. दिनांक 31 जुलै 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सदाशिवराव माने विदयालय अकलुज, दुपारी 2.00 वाजता अरिहंत पब्लिक स्कुल मनिषा नगर पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन होणार आहे.

तसेच सोलापूर महानगर पालिका अतर्गंत असणाऱ्या  शाळांसाठी दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.00 जिल्हा क्रिडा संकुल कुमठा नाका,सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केले असून, सदर बैठकीस सोलापूर जिल्हयातील सर्व क्रिडा शिक्षक, क्रीडा

मार्गदर्शक, संबंधित सह शिक्षक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवारृ  यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, कुमठा नाका,सोलापूर येथे संपर्क साधावा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *