
मदनदास देवीजी यांचे अंतिम दर्शन
पुणे प्रतिनिधी
मोतीबाग (पुणे) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी सहसरकार्यवाह मदनदास देवीजी यांचे अंतिम दर्शन प्रमुख राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, संघातील मान्यवरांनी घेतले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.



