करमाळ्यात मोहरम निमित्त शांतता कमिटीची बैठक

करमाळा प्रतिनिधी

करमाळा पोलीस स्टेशन येथे मोहरम निमित्त शांतता कमिटीची बैठक पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या प्रमुख

उपस्थित पार पडली. यावेळी शिवसेना नेते संजय शिंदे, नगरसेवक शौकत नालबंद, करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, अलसहारा सोशल ग्रुपचे संस्थापक हाजी समीर शेख, जाकीर वस्ताद, सारंग परदेशी, बबन दुधाट, मैनुद्दीन

निजाम शेख, बिलाल कुरेशी, सिंकदर सय्यद, उमर मदारी, देवीदास घोडके, सद्दाम मुबारक शेख, ओंकार परदेशी आदी जण उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे म्हणाले की, सर्व हिंदू मुस्लिम बांधवानी मोहरमचा सण हा शांततेत साजरा करुन

एक समाजापुढे आदर्श निर्माण करा. दिलेल्या वेळेतच सवारीची मिरवणूक काढावी असे ते यावेळी म्हणाले. शेवटी गणेश दळवी पोलीस यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *