अनाथ मुलांसमवेत दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी

स्वामी -चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस शुक्रवार दिनांक 21

जुलै 2023 रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सदर वाढदिवसाचे औचित्य म्हणून राणादादा यांचे निसर्गप्रति असलेले प्रेम पाहून त्यांच्याच संकल्पनेतून वाढदिवसाची  सुरुवात संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करून करण्यात आले. सदर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे

अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच राणादादा सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपवणूक करता यावी म्हणून  कुरकुंभ, ता. दौंड येथील अविश्री बालसदन अनाथ आश्रमातील मुलांना पावसाळी रेनकोटचे तसेच जीवनावश्यक

किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले व उपस्थित सर्व मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला व सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर राणादादा यांनी त्या मुलांना दिलेल्या संदेशाचे व त्यांच्याप्रति असलेली आत्मीयता कशाप्रकारे व्यक्त

केली जाते ती त्यांचे दिलेल्या संदेशासोबत उपस्थित सर्व मुलांना वाचून दाखवण्यात आली. सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे विविध प्रतिनिधी व आश्रमातील पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारे एक सामाजिक उपक्रम राबवून दत्तकला शिक्षण

संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *