
करमाळा तालुक्यातील युवकांनी विकास कामांवर करडी नजर ठेवावी – संजय घोलप
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील युवकांना संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळाच्या वतीने

आव्हान करण्यात येते कि आजची तालुक्यातील राजकिय परिस्थीती बघता विकास कामांवर करडी नजर ठेऊन तालुक्यातील कामं ही नियमानुसार होतात का पाहावे.
तालुक्यात सरकार कडुन लाखो ..करोडो रूपये निधी देऊन विविध योजनांतर्गत मग ते रस्ते ,वीज पाणी , बांधकाम असे कामे

येत आसतात. परंतु या कामावर तालुक्यातील कोणाचाही अंकुश नसल्यामुळे निकृष्ट दर्जाचे कामे होत आहेत व सर्व आपल्या भरलेल्या टॅक्स मधला पैसा ठरावीक माणसांची घरे भरण्यासाठी जात आहे ..
एक तर हे कामासाठी निधी मिळवून आणण्यासाठी वर्षानु वर्ष वाट बघावी लागते आणि आपण आलेल्या कामांवर लक्ष दिले

नाही तरं एका वर्षाच्या आत सर्व कामे झाले होते का नाही अशी परिस्थिती होते.. लोकप्रतिनिधी अधिकारी यांची ठेकेदाराकडून होणारे कामांवर दुर्लक्ष व डोळेझाक करताना दिसतात त्यामुळे ही जबाबदारी आता तालुक्यातील सुधन्य नागरीक व युवकांनी स्व:ता लक्ष घालुन विकास कामं दर्जेदार होण्यासाठी इस्टीमेट नुसार खरंच होतात का ही करडी नजर ठेवून बघण्याची वेळ

आली आहे..तरी आपण सर्वानी कामे इस्टमेट नुसार होतात का ह्याची बारकाईने बघावे व काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करावे मो.9011148077 किंवा त्या कामाच्या वरिष्ठ अधिकारांना तक्रार करावी असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळाच्या वतीने करत आहे.
