
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाचा लाभ घ्या जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे
करमाळा प्रतिनिधी
आज दिनांक 22 जुलै 2023 रोजी मौजे सावडी या ठिकाणी कृषी विभाग विद्यमान प्रधान मंत्री फसल बीमा योजना 2024,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना व विविध योजनांचे माहितीचा कार्यक्रम घेण्यात आला.

कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव, महेश काळे, सरपंच शशिकला शेळके, कृषी सहाय्यक हरि दळवी, आसिफ तांबोळी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे व मंगेश भांडवलकर आणि सावडी गावातील महिला शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उमाकांत जाधव कृषी यांनी एक रुपयात प्रधान मंत्री फसल बीमा योजना मधे विमा कसा भरावा या विषयी सविस्तर

मार्गदर्शन केले व प्रतिनिधिक एक अर्ज प्रतक्ष भरुन दाखवला. तसेच विमा कसा मिळते याची माहिती सांगितली. खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकामध्ये तूर, मूग, उडीद, गळीत धान्य मधे सूर्यफूल, तृणधान्ये मध्ये बाजरी, मका, भाजीपाला, पिकांत कांदा या पिकांचा समावेश असतो असे सांगितले.

यानंतर कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने पौष्टीक तृणधान्ये लागवड तंत्रज्ञान व त्यांचे आहारातील महत्त्व उपस्थित महिला शेतकरी यांना सागितले.

मनोज बोबडे जिल्हा संसाधन व्यक्ती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना यांनी विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामधे त्यांनी करमाळा तालुक्यातील आतापर्यंत झालेले प्रकिया उद्योगाची माहिती दिली व या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. शेवटी आभार प्रदर्शन आसिफ तांबोळी यांनी केले .
