संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानचे विभागीय उपायुक्त विजयराव मुळीक यांची मांगी गावाला सदिच्छा भेट 

करमाळा प्रतिनिधी  

विजयराव मुळे पुणे विभागीय उपायुक्त विकास यांची आज करमाळा तालुक्यातील खडकी येथील संत गाडगेबाबा स्वच्छता

अभियान पाहणी करण्यासाठी कमिटी आली होती . खडकी गावी जात असताना करमाळा तालुक्यामध्ये बिडिओ म्हणून साहेबांनी स्वच्छता अभियान बचत गट यामध्ये मोठे काम केले होते आणि मांगी हे गाव हागणदारी मुक्त स्वच्छता अभियान साठी दत्तक घेतले होते. साहेबांनी खडकीला जात असताना आवर्जून मांगी येथील जुन्या आठवणी जागे केले व गावाला

सदिच्छा भेट दिली माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी साहेबांबरोबर काम केलं होतं त्याचीच आठवण म्हणून साहेबांनी आम्हाला भेट दिली व सुदाम्याचे पोहे गोड म्हणून खाल्ले. त्याची प्रचिती काल आम्हाला पहावयास मिळाली. घार उडते आकाशी चित्त तुझे पिलापाशी या म्हणीप्रमाणे साहेबांनी मांगी गावांमध्ये शौचालय बांधकामांमध्ये स्वच्छता अभियान मध्ये

बचत गटांमध्ये एक चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन आम्हाला केलं होतं आणि या मार्गदर्शनाचा उपयोग आमच्या भावी जीवनामध्ये आम्हाला झालेला आहे. असे अधिकाऱ्याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत..

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मांगी ग्रा. सदस्य सुजित तात्या बागल, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल अवचर, अनिल बागल, निळकंठ बागल, वैभव बागल, मच्छिंद्र बागल, संभाजी राजे बागल, अभिमान अवचर, अॅडव्हकेट बागल, ग्रामसेवक मोकाशी, नलवडे यांच्या सह मांगी ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *