
करमाळा नगरपरिषदेचा भोंगळ कारभार अधिकारी विना चालतोय-सुनील सावंत
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेचा कारभार अधिकारी विना चालतोय असे निर्दशनास आले असुन शहर विकास आघाडीचे गटनेते सुनील बापू सावंत यांनी काही पत्रकार समवेत करमाळा नगरपरिषदमध्ये बसुन नगरपालिकेच्या कारभाराविषयी चौकशी केली

असता करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे है तीन महीने रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड़ प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन काम बघत आहेत. त्यांना अतिरिक्त पदभार असल्याने ते आठवड्यातुन एकदाच येत असल्याचे समजते. तर मुख्याधिकारी नंतर कार्यालयीन अधिक्षक बदे हे पण रजेवर

गेल्याने त्यांच्या जागेवर करनिरीक्षक हे काम पहात आहे. तर आरोग्य निरीक्षक जब्बार खान सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अद्याप पर्यंत प्रशासनाकडुन कोणतीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. शहरात प्रचंड प्रमाणात घाण झालेली आहे. रस्त्यावरुन गटारीचे पाणी वाहत आहे. शहरात अनेक ठिकाणी साफसफाई स्वच्छता करणारे ठेकेदाराचे सफाई

कर्मचारी पंधरा पंधरा दिवस ऐकेका भागात सफाई साठी जात नाहीत. कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे कुणाचे शहर स्वच्छताकड़े लक्ष नाही. तसेच करमाळा नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विष्कळीत झाला असुन या बाबत अधिकारीचे नियोजन नाही. पाणी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असुन पाणी साठविण्यासाठी अतिरिक्त टाकी नसल्यामुळे दहीगाव पंपिंग स्टेशन

येथे घोटाला झालातर शहरात पाणी पुरवठा करता येत नाही. त्यामुळे साठा करण्यासाठी अतिरिक्त टाकीची आवश्यकता आहे. तसेच बांधकाम इंजिनियर विशाल मुळे हे दोन दिवस करमाळ्यात असतात व इतर दिवशी पुणे येथे प्रभारी म्हणुन काम पहात आहेत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. तसेच त्यांच्याकड़े नगररचनाकार चा अतिरिक्त पदभार असल्याने शहरातील

बांधकाम परवाने साठी नागरीकांना हेलपाटे मारताना दिसत आहे. एकंदर परिस्थिती पाहता नगरपालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी पाहीजे व अधिकारीची रिक्त पद भरली जावी. यासाठी वेळ पडल्यास दररोज आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शहर विकास आघाडीचे गटनेते सुनील बापू सावंत यांनी दिला आहे.