
डिकसळ पुलाच्या कामास सुरुवात
करमाळा प्रतिनिधी
मौजे कोंढार चिंचोली तालुका करमाळा ते डिकसळ तालुका इंदापूर या जुन्या रेल्वे लाईन शेजारी नवीन पुलाचे काम मंजूर होऊन निविदा अंतिम झालेली असून सदरचे काम हे मेसर्स व्ही. एस. पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी शिरपूर धुळे यांना मिळालेले

असून सदर पुलाच्या कामाचे ठेकेदार विजय पटेल व राहुल पटेल यांनी कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंके यांच्या समवेत नवीन पुलाच्या कामाच्या ठिकाणी साईट व्हिजिट दिली व नवीन पुलाच्या कामाबाबत चर्चा केली. पुलाचे पाईल

टेस्टिंगच्या कामास प्राथमिक स्वरूपात सुरुवात गुरुवार दिनांक 20/07/2023 रोजी केली व नवीन पुला विषयी बोलताना सदर पुलाचे कामासाठी लागणारी वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) सात दिवसात शासन स्तरावर मिळेल व सदर पुलाचे कामासाठी

प्रत्यक्षात सुरुवात होईल सदरचे काम हे तीन वर्षात पूर्ण करू असे आश्वासन ठेकेदार विजय पटेल यांनी साळुंके यांना दिले सदरचे काम हे 420 मीटर लांबीचे असून अकरा मोऱ्या वरती हा पुल असेल असे सांगितले या पुलाच्या कामासाठी केलेल्या

प्रयत्नांना यश आल्याने साळुंके यांनी समाधान व्यक्त केले व तालुक्यातील वार्ताहर मंडळींचे आभार मानले

