संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान दरमहा रुपये 1000/- वरून 1500/-रुपये केले – प्रा. शिवाजी बंडगर

करमाळा प्रतिनिधी

करमाळा – (दि. 7) महाराष्ट्र राज्य सरकार ने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान दरमहा रुपये 1000/- वरून 1500/-रुपये केले असल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चे माजी अध्यक्ष तथा करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर यानी दिली.

या बाबत बोलताना बंडगर म्हणाले की, गेली अनेक वर्षे सं. गां. निराधार  योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या गोर गरीब, निराधार, विधवा, परीतक्ता महिला,वृद्ध आदींना रूपये दरमहा 1000/- इतके मिळत आहे. या अनुदानात  वाढ करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. आपण अध्यक्ष असताना आम्ही ही अनेकदा सरकार कडे मागणी केली होती.

याचा सारासार विचार करून शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात या बाबत निर्णय केला होता. परंतु अध्याप अंमलबजावणी केलेली नव्हती. दि. 5 जुलै रोजी अंमलबजावणी बाबत चा शासनादेश जारी केला असून जुलै 2023  पासून याची सुरूवात करण्यात येणार आहे.

बंडगर पुढे म्हणाले की, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व योजना म्हणजे सं. गां. योजना, ईंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आदि सर्व 

योजना साठी देखील ही 500 रुपयाची वाढ आहे. करमाळा तालुक्यातील सुमारे नऊ हजार लाभार्थ्याना याचा लाभ होणार असून तालुक्यात दरमहा आता पूर्वीपेक्षा साडेचार लाख रुपये जादा येणार आहेत.

या वाढी मुळे सं. गा. योजनेतील लाभार्थ्यां मधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *