बाळासाहेब बोडखे यांचे  ई-बालभारती(SCERT) येथून प्रभावी सादरीकरण..

शिकू आनंदे कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा घेतला सक्रिय सहभाग आणि जिंकली विद्यार्थ्यांची मने..

करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अर्थात एससीईआरटी द्वारा राबविण्यात येत असलेला शिकू आनंदे या कार्यक्रमात बाळासाहेब बोडखे यांनी प्रभावी सादरीकरण केले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या द्वारा यूट्यूब च्या माध्यमातून दर शनिवारी सकाळी 9 ते 10 या वेळेत इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तर सकाळी दहा ते अकरा या वेळेत इयत्ता सहावी ते आठवीसाठी “शिकू आनंदे” हा

कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. ई-बालभारती पुणे येथील अत्याधुनिक सुविधायुक्त असणाऱ्या स्टुडिओ मधून या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाते. महाराष्ट्र शासनाने पुरविलेल्या 761 शाळांमधील विद्यार्थी या स्टुडिओशी जोडलेले

असतात तर युट्युब द्वारा सर्वजण या कार्यक्रमाचा लाभ  घेऊ शकतात. शनिवार हा दप्तर मुक्त शनिवार अर्थात फनीवार म्हणून साजरा करत विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यावर भर दिला जातो.

आज दिनांक 8 जुलै 2023 रोजी घेण्यात आलेल्या शिकू आनंदे या कार्यक्रमाच्या या दोन्हीही भागाचे सूत्रसंचालन तसेच प्रत्यक्ष घटक सादरीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 ता. करमाळा जि. सोलापूर या

शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे यांना संधी देण्यात आली होती. यामध्ये त्यांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटासाठी संगीतमय तालबद्ध शारीरिक हालचाली हा घटक सादर केला तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी झुंबा नृत्य हा प्रकार घेतला.

‘निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे’ हा संदेश देणारा आणि व्यायामाचे महत्त्व पटवून सांगणारा हा घटक उत्साहात सादरीकरण केल्याने विद्यार्थ्यांनीही त्यामध्ये जल्लोषात सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारा सहभाग घेत,  प्रभावी सादरीकरण केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी संजय जावीर, गट विकास अधिकारी मनोज राऊत, राजाराम भोंग, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील,  शिक्षण विस्तार अधिकारी संपत नलवडे, निळ, जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख महावीर गोरे, खातगावच्या सरपंच सुवर्णा अविनाश मोरे, शा. व्य. स. चे अध्यक्ष संतोष झेंडे तसेच सहशिक्षक किरण जोगदंड आणि समस्त शिक्षकांनी बाळासाहेब बोडखे यांचे विशेष अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *