
पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी csc केंद्राना अतिरिक्त पैसे देऊ नयेत :- नितीन झिंजाडे
करमाळा प्रतिनिधी
पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी csc केंद्राना अतिरिक्त पैसे देऊ नयेत असे आवाहन भाजपचे नितीन झिंजाडे यांनी केले आहे. याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, राज्यातील भाजप सेना राष्ट्रवादी या महायुती सरकारने पंतप्रधान पीक विमा

योजनेअंतर्गत फक्त 1 रुपयात शेतकऱ्यांच्या पिकाला विमा कवच जारी केले आहे. बाकी विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेमुळे फायदा होणार आहे. पीक

विमा काढताना विमा कंपन्या csc केंद्राना प्रती अर्ज 40रु देत असते परंतु शेतकऱ्यांकडून काही csc सेंटर चालक अतिरिक्त 100-200 रुपये बेकायदेशीरपने घेत आहेत. एखाद्या कुटुंबात ४-५ खाती असल्यास हजारो रुपये csc सेंटर चालक

शेतकऱ्यांकडून घेत आहेत. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खर्चिक झाली आहे. यामुळे शासनाच्या मुळ हेतूस तडा बसत आहे. csc केंद्राना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेता येणार नाहीत याबाबत कृषी आयुक्त महाराष्ट्र यांनी स्पष्ट आदेश दिले

आहेत. csc सेंटर संचालक अतिरिक्त पैसे मागत असतील किंवा पीक विमा भरणेसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे सहकार्य करत नसतील तर तालुका कृषी अधिकारी किंवा तहसीलदार यांचेकडे तक्रार करावी असे आवाहन झिंजाडे यांनी केले आहे.

