
अर्जुननगर येथे लक्ष्मीआई यात्रा विविध सामाजिक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे याही वर्षी करमाळा तालुक्यातील मौजे अर्जुननगर येथे ग्रामदैवत वेताळ साहेब व लक्ष्मी यात्रा उत्साहात

संपन्न झाली. यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे बारा गाड्या ओढणे बारा गाड्या ओढण्याचा मान गावातील बाबुराव लोंढे यांना असून त्यावेळी त्यांचे सोबत त्यांचे पुत्र किरण लोंढे, मालती लोंढे याही उपस्थित होत्या. लक्ष्मी आई यात्रेनिमित्त ग्रामपंचायत च्या

वतीने ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ४/७/२०२३ रोजीरक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीराचे उद्घाटन सरपंच चंद्रकला भोगे माजी सरपंच अनिल थोरात यांचे हस्ते करण्यात आलें. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापुराव

ढवळे, कैलास पवार, अमोल पवार, माजी सरपंच प्रकाश थोरात, ग्रामसेवक मनोज अंगद लटके व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच लक्ष्मी आई यात्रेनिमित्त ग्रामपंचायतचे वतीने ५/७/२०२३ रोजी गावातील ग्रामस्थ यांचेसाठी मोफत नेत्र तपासणी व

चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराचे उद्घाटन यात्रा कमिटी व ग्रामपंचायत यांचे मार्फत करण्यात आले. रात्री यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांचे वतीने संगीत बंन्ड आयोजित करण्यात आले होते.

