
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी
करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली होती. आई हा आपला पहिला गुरु मानून प्रथम मुलांनी त्यांचे पूजन केले. नंतर मुलांनी शिक्षकांना गुलाब देऊन त्यांचा सन्मान केला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर

साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र म्हणाले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी केले. तर

कार्यक्रमाचे आयोजन सहशिक्षिका शिवांगी शिंदे,शुभांगी खळदकर, आश्विनी महामुनी, उमा पाटील, पुजा ठेंगडे,कोमल बत्तीशे

अंजुम कांबळे, सविता पवार, रोहिणी गरड, आदिंनी परिश्रम घेतले होते. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
