
भारत राष्ट्र समिती च्या करमाळा तालुका समन्वयक पदी अण्णासाहेब विठ्ठल सुपनवर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वाशिंबेगावचे सुपुत्र तुळशी वृंदावन डेव्हलपर्स अँड कंट्रक्शन कंपनीचे सुप्रसिद्ध उद्योगपती अॅड. पांडुरंग रावजी झोळ साहेब यांनी भारत राष्ट्र समिती च्या करमाळा तालुका समन्वयक पदी अण्णासाहेब

विठ्ठल सुपनवर यांची निवड झाल्याबद्दल करमाळा मित्र मंडळ पुणे पिंपरी चिंचवड पुणे येथे रहिवाशांच्या वतीने सत्कार केला. भारत देशाचे नेते तेलंगणाचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी. आर. एस. ची

घोडदौड चालू आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघ मध्ये सभासद नोंदणी व शेतकऱ्यांच्या गाव भेटी हा कार्यक्रम चालू आहे. त्याला शेतकरी वर्गांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. करमाळा तालुक्यातील काही मतदार पुणे पिंपरी चिंचवड येथे उद्योग

व्यवसायासाठी गेलेले आहेत. त्यांच्या वतीने अण्णासाहेब सुपनवर यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अॅड. हरिभाऊ मोरे, काका मेंगळे, अभिजीत झोळ, पांडुरंग सुपनवर व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


