तहसीलदार नियुक्ती न झाल्यास महसूल मंत्री यांना काळे झेंडे दाखवुन आंदोलन करणार – अध्यक्ष संभाजी शिंदे

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यासाठी नवनियुक्त तहसीलदार नियुक्ती न केल्यास  काँग्रेस पार्टी  महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांना  काळे झेंडे दाखवुन आंदोलन करणार आसा इशारा  काँग्रेस पार्टीचे करमाळा तालुका युवक अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी दिला आहे

यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, करमाळा तालुक्या  मधील तहसीलदार समिर माने  यांची बदली होऊन जवळ पास दोन तीन महिने झाले तरी देखील करमाळा तालुक्यासाठी नवनियुक्त  तहसीलदार  नियुक्ती केली जात नाही यामुळे करमाळा तालुक्या  मधिल सामान्य नागरीकांना प्रशासकीय कामासाठी अनेक अडचणी येत आहेत आर्थिक लुट होत आहे तक्रार

करायची कोणाकडे हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे  तहसीलदार नसल्यामुळे सर्व सामान्य जनतेची गैरसोय होत आहे प्रशासकीय अधिकारी वरती कोणाचे नियंत्रण राहिले नाही शासकीय कार्यालय धर्मशाळा झाले आहेत त्यासाठी आपण पक्ष नेते नानासाहेब पटोले यांची  भेट घेऊन परिस्थिती त्यांच्या समोर मांडणार आहे तसेच लवकरात लवकर करमाळा तालुक्यामधील तहसीलदार  यांचा प्रश्न मार्गी न लावल्यास पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवुन काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने लवकरच आंदोलन केले जाईल आशी माहित तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी दिली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *