
आळजापूर येथे शालेय साहित्य वाटप
करमाळा प्रतिनिधी
आळजापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दरवर्षी प्रमाणे, या वर्षी देखील अशोका फाउंडेशन व स्व अशोक रोडेपाटील प्रतिष्ठाण, आळजापूर यांच्या वतीने इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरतील इतके शालेय

साहित्य व वह्या देण्यात आल्या, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून हरिदास केवारे (संचालक आदीनाथ सह. साखर कारखाना), बिभीषण खरात (माजी सरपंच), इंजि. संजय अशोक रोडे (ग्रा. पं. सदस्य), भाऊसाहेब रोडे (तंटामुक्ती

अध्यक्ष), अण्णासाहेब काळे, दादासाहेब नवले (कृषी सहायक), विश्वंभर रोडे (पोलिस पाटील) हे उपस्थित होते.
यावेळी गावातील ग्रामस्थ व सुभाष रोडे, नवनाथ भालेराव (माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती), युवराज गपाट

(चेरमान दूध डेअरी), शशिकांत घोडके (नेते म न से), महादेव गायकवाड (ग्रा. पं. सदस्य), सुरेश गपाट (शाळा व्यवस्थापन अध्यक्ष), विनोद नवले (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य), मछद्र रोडे ( शाळा व्यवस्थापन समिती सदस्य), लालासाहेब

काळे, अण्णासाहेब रोडे, अशोक रोडे, राजेंद्र रोडे, शरद रोडे, महादेव रोडे, सोमनाथ रोडे, दत्तात्रय झाम्बरे, दत्ता काळे, लक्ष्मण वाघमोडे (उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती), प्रकाश पवार, दत्ता टेबाळे (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य), अजिनाथ

भालेराव, संतोष भालेराव, दिगंबर रोडे, सूरज शिंदे, व शाळेचे सर्व शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक लहू चव्हाण सर यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.