
जेऊर येथे शाहू महाराज जयंती साजरी
जेऊर प्रतिनिधी
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालय मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४९ वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू

महाराज हे सामाजिक लोकशाहीचे पुरस्कते होते. आज सर्वच जण राजर्षी शाहूंच्या नावाचा जयजयकार करत असले तरी शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे विचार रुजवण्याचे आवश्यकता आहे. शालेय अभ्यासक्रमात राजर्षी शाहूंच्या विचारांचा व्यापक

समावेश व्हायला हवा समाज मान बदलण्यासाठी नव्हे तर छोट्या छोट्या पण गोष्टीमधूनही हा विचार रुजवला जायला हवा आणि हे जबाबदारी प्रत्येक पालकाची राजकीय व सामाजिक कार्यकर्त्याची ही आहे. त्यासाठी शाहू विचारांवर चालण्याचे

भूमिका प्रत्येकाने द्यायला हवी. शाहूंचे विचार मानणारे अनेक नेते कार्यकर्ते आहेत. यांच्याकडून शाहू विचाराचा प्रसार होत असताना तरुण वर्गापर्यंत हे विचार पूर्णपणे पोहोचत नाही. पोहोचवण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शाहू

विचारांवर चालण्याचे भूमिका प्रत्येकाने द्यायला हवी केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण देशभरातील समाज एकत्रित राहण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या कृतीतून युवा वर्गाला मार्ग दाखवून सलोखा पण करणे ही आजची नितांत गरज आहे

आणि तीच राजर्षी शाहु महाराजांना खरी आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित पुणे विभागीय अध्यक्ष संभाजी नितीन खटके, निलेश पाटील, शहराध्यक्ष अतुल निर्मळ, विश्वनाथ सुरवसे, आदिनाथ माने, पिंटू जाधव, अजित पवार, गणेश चव्हाण, सागर लोंढे, रंजीत कांबळे, सागर जाधव, अविनाष घाडगे, अजित उपादे, सागर बनकर, नितीन घोगरे, संपत लवळे, गोटू मोरे, अमोल गुंड, इत्यादी उपस्थित होते.