श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालयात डॉ. हेलन केलर यांची जयंती साजरी

श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीचा माळ या ठिकाणी दिव्यांगाचे आराध्य दैवत डॉ. हेलन

केलर यांची 143 वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त विद्यालयांमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  त्यामध्ये लगोर पाडणे, बादलीत बॉल टाकने,वसपीच स्पर्धा. आशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या… स्पर्धेत नंबर

मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष शिक्षक येलाले. एस व्ही . तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे पालक प्रतिनिधी कुंडलिक शिंदे (तलवडी ता.

कर्जत) कलाशिक्षक ज्ञानदेव गुरुमे सर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवाराच्या हस्ते डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यत आले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन भालेराव सर यांनी केले तर आभार गणेश सातपुते

सर यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली..

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *